सुरज यादव यांनी  तक्रारी करताच  नाली दुरुस्तीचे काम झाले सुरू

सनासुदीच्या पार्श्वभूमिवर स्वच्छते बाबत केली होती पालिकेत तक्रार 

 

खामगाव,

 शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील कमान गेट ते मानाचा लाकडी गणपती मंदिर तसेच खाटू श्याम मंदिर परिसरातील नालीची समस्या अखेर मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नाली तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक, व्यापारी आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सूरज एस. यादव यांनी  खामगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने ९ सप्टेंबरपासून नाली दुरुस्तीचे काम हाती घेतले. यावेळी मोठ्या आकाराचे आरसीसी पाईप टाकून त्यावर सिमेंट काँक्रीट करण्यात आले. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येवर उपाययोजना होण्यास सुरुवात झाली आहे.

   प्रभाग ८ मध्ये नालीत पाणी वाहत नसल्याने या ठिकाणी मोठया प्रमाणात कचरा जमा झाला होता, येत्या काळात विविध सण त्यौहार आहे. या काळात परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यासाठी सुरज यादव यांनी पालिकेत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत ही बाब लक्षत आणून दिली होती. सदर मागणी पुर्ण न झाल्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. त्या पश्चात पालिकेच्यावतीने सदर हातात घेतले. या मुळे  परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, सामाजिक कार्यकर्ते सूरज यादव यांच्या पाठपुराव्याचे तसेच नगर परिषद प्रशासनाच्या कार्यवाहीचे स्वागत केले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!