चिखलीत स्व. अजित पवारच्या अस्थिकलशाला सामूहिक अभिवादन

प्रतिनिधी | चिखली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे विधीवत पूजन करून त्यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम नुकतेच पार पडला.
स्व. अजित पवार यांच्या अस्थिकलश दर्शन यात्रेला मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी शहरातील जयस्तंभ चौक, डॉ. बाबासाहेब आंबडेकर वाटीका येथे सकाळी ११. ३० वाजता स्व. अजित पवार यांचा अस्थीकलश दर्शनासाठी ठेवून सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी अजित पवार यांचे दूरदर्शी नेतृत्व, तडफदार कार्यशैली, सामान्य जनतेसाठी अखंडपणे केलेला संघर्ष व त्यागमय जीवन सदैव स्मरणात राहील. त्यांच्या अकाली जाण्याने राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असून, त्यांच्या कार्याची आणि आठवणींची उजळणी जनसामान्यांच्या मनात सदैव जिवंत राहील, अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी आमदार श्वेताताई महाले, शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर, सिंदखेड राजाचे आमदार मनोज कांयदे , माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, दिलीपकुमार सानंदा, नरेश शेळके, श्रीमती लक्ष्मी बोन्द्रे, विजया खडसन, दत्ता खरात, मनोज दांडगे, संजय गाडेकर, गजानन वायाळ, निलेश गावंडे, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष चिखली तालुका अध्यक्ष संतोष परिहार, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, संजय चेके पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, युवासेना जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे, अशोक अग्रवाल, बाळासाहेब पाटील, दिपक म्हस्के, आदी असंख्य नागरिक तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!