उन्हं / सावली, नव्हे आता पाउस
राज्यातील १२ जिल्हयांना पावसाचा येलो अलर्ट

प्रतिनिधी | बुलडाणा
पश्चिम विदर्भासह विदर्भातील अनेक जिल्हे उन्हां मुळे तळपू लागली आहे. पश्चिम विदर्भातील अकोला जिल्हा तर देशात सर्वात जास्त उष्ण जाहिर करण्यात आला आहे. या पाठोपाठ विदर्भातील अमरावती, यवतमाळ व वर्धा ही उष्ण असल्याचे जाहिर करण्यात आले होते. या तापमानामुळे विदर्भातील नागरिक हैरान झाला होता. आता या उष्णतेला थोडी उतरती कळा लागली असल्याची माहिती आहे. राज्यात येत्या तीन दिवस राज्यातील सुमारे १२ जिल्हयांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे३
या भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
एप्रिलच्या सुरुवातीला राज्यातील काही भागांत गारपीट झाली होती. त्यानंतर मात्र तापमानात सातत्याने वाढ होत असून विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. पुणे परिसरातही उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना प्रखर उकाड्याचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर हवामानात होत असलेला बदल महत्त्वाचा ठरत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, वातावरणाच्या खालच्या थरात (समुद्रसपाटीपासून सुमारे १.५ किमी उंचीपर्यंत) वाऱ्याची खंडितता ईशान्य मध्य प्रदेशातील चक्रीय स्थितीपासून मन्नारच्या आखातापर्यंत मराठवाडा व विदर्भ मार्गे विस्तारलेली आहे. तसेच मधल्या थरात (३.१ ते ५.८ किमी उंचीवर) कर्नाटक व लगतच्या महाराष्ट्रावर प्रतिचक्रीय स्थिती स्थिरावलेली आहे. या हवामानस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्हयांना मिळाला आहे येलो अलर्ट
१८ एप्रिल : सोलापूर, धाराशीव
१९ एप्रिल : सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड
२० एप्रिल : अहिल्यानगर, पुणे, सातारा, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, नांदेड
या जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.




