वन्य प्राण्याच्या हल्यात कोतवालचा मृत्यु, आ. गायकवाड धावले मदतीला
मृतकाच्या परिवारास २५ लाखाच्या मदतीसह शासकिय नोकरीसाठी प्रयत्नाची ग्वाही

-
- बुलडाणा |
मोताळा तालुक्यातील मौजे सारोळापीर येथील मृतक कोतवाल गोपाल वासुदेव बावस्कर यांचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना समजताच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृताच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
शोकाकुल परिवाराशी संवाद साधताना आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी तुम्ही कठीण प्रसंगी खचून जाऊ नका. मी तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी मृताच्या कुटुंबीयांना स्वतःच्या परीने रोख ५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत सुपूर्द केली. तसेच वनविभागाच्यावतीने मृतकाच्या परिवारास २५ लाखाची मदत सोबतच मृत व्यक्तीच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत व्हावा यासाठी स्व. गोपाल बावस्कर यांच्या पत्नीला अनुकंपा त
बुलडाणा
मोताळा तालुक्यातील मौजे सारोळापीर येथील मृतक कोतवाल गोपाल वासुदेव बावस्कर यांचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना समजताच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृताच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
शोकाकुल परिवाराशी संवाद साधताना आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी तुम्ही कठीण प्रसंगी खचून जाऊ नका. मी तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी मृताच्या कुटुंबीयांना स्वतःच्या परीने रोख ५० हजारांची तात्काळ आर्थिक मदत सुपूर्द केली. तसेच वनविभागाच्यावतीने मृतकाच्या परिवारास २५ लाखाची मदत सोबतच मृत व्यक्तीच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत व्हावा यासाठी स्व. गोपाल बावस्कर यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, यासाठीही शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याची ठाम ग्वाही आमदार गायकवाड यांनी दिली. त्यांच्या या शब्दांमुळे दुःखात असलेल्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, मात्र त्याचवेळी त्यांना आधाराची भावना निर्माण झाली.
आमदार गायकवाड यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिसरात वन्य प्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी आरएफओ आळसपुरे साहेब, वनपाल साळोख, वनरक्षक राठोड, तसेच गणेशसिंग राजपूत, प्रवीण जाधव, अजय बिल्लारी, ज्ञानेश्वर वाघ, राजू बोरसे, चेतन अवचार, सुधाम सोनुने, अमोल वखरे, अरुण डोंगरे, संजू चव्हाण, ज्ञानेश्वर बावस्कर, गोपाळ शिंदे, कृष्णा भातुरकर, गोलू बावस्कर, संतोष सपकाळ, सचिन बावस्कर, बंटी सपकाळ, निखिल बोरसे, गणेश भातुरकर, अविनाश चव्हाण यांच्यासह वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




