बाळाभाऊ शेडगे यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यात पक्षाचा जनाधार वाढणार :  अमोल रिंढे पाटील

मनसेचे संपर्क अध्यक्षपदी बाळाभाऊ शेडगे यांची निवड

 

प्रतिनिधी | बुलढाणा
   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आश्वसाक चेहारा म्हणून राज्याला परिचित असणारे तसेच पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळाभाऊ शेडगे यांची  महाराष्ट्र नवनिर्माण सेना  पक्षाने बुलढाणा जिल्हा संपर्क अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे. मनसे अध्यक्ष राज  ठाकरे यांनी त्यांना नियुक्ती पत्र देवून त्यांचा सत्कार केला आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात पक्ष संघटनेला मोठे बळ मिळणार आहे. पक्षाच्या वाढीसाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
    पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक असलेले शेडगे हे पक्ष स्थापनेपासून राज  ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निष्ठेने कार्यरत आहेत. मनसेच्या स्थापनेपासूनच त्यांनी पक्षविस्तार, संघटन मजबुतीकरण आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि संघटन कौशल्यामुळे त्यांची पक्षात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वात २९ नगरसेवक निवडून आले होते. तर पुणे  महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेताही मनसेचा होता, हे विशेष ..!  राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मनसेत त्यांनी  भारतीय विद्यार्थी सेना  या विद्यार्थी संघटनेत सक्रिय सहभाग घेत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. विद्यार्थी चळवळीतील त्यांच्या कामामुळे त्यांना तरुण कार्यकर्त्यांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या विविध पदांवर काम करत अनुभव संपादन केला.
मनसेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी राज्यभर पक्ष विस्तारासाठी विशेष प्रयत्न केले. विविध आंदोलने, संघटनात्मक बैठकांद्वारे त्यांनी पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवली. त्यांच्या कामाची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांना अधिक जबाबदाऱ्या सोपवल्या. सध्या ते पक्षाच्या सरचिटणीस पदावर कार्यरत असून, संघटनात्मक पातळीवर ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
बाळाभाऊ शेडगे यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यात पक्षाचा जनाधार वाढणार :  अमोल रिंढे पाटील
बाळाभाऊ शेडगे यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यात मनसेच्या कार्याला अधिक गती मिळेल. आगामी काळात जिल्ह्यात पक्षाचा जनाधार वाढवणे, नवीन कार्यकर्त्यांना संधी देणे आणि स्थानिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका मांडणे यावर त्यांचा भर राहणार आहे. एकूणच, त्यांच्या अनुभव, संघटन कौशल्य आणि पक्षनिष्ठा यामुळे ही निवड मनसेसाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास बुलढाणा मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यात त्यांचा लवकरच दौरा राहणार असल्याची माहिती अमोल रिंढे पाटील यांनी दिली आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!