भारतात रशियाची ३ हजाराची फौज येणार

   इराण - अमेरिका युध्दात भारत आपोआपच खेचला जातोय

 

प्रतिनिधी | नवी दिल्ली

 

जागतिक पातळीवर युध्दाच्या हालमाची मोठया प्रमाणात घडत आहे. इराण ने समुद्रधूनीत बंदी केल्यानंतर अमेरिकेने आफ्रिकेला वळसा घालत मध्य समुद्रात आपल्या युध्द नौका पाठवल्या आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या जमीनीवर लढाउ विमान उतरवण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे रशियाने देखील भारताशी संरक्षण करार करत, या कराराच्या नावाखाली भारताच्या भूमीत तीन हजार सैनिक उतरवण्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरील तनाव आणखीच वाढत असल्याचे चित्र आहे.

इराण, अमेरिकेच्या युध्द पार्श्वभूमिवर भारत आणि रशिया यांच्यातील रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट  संरक्षण करार आता लागू झाला आहे. सदर करार हा संरक्षण करार आहे. या अंतर्गत दोन्ही देश एकमेकांच्या भूमीवर 3000 सैनिक तैनात करू शकतील. यासोबतच 5 युद्धनौका आणि 10 लष्करी विमानांच्या तैनातीलाही परवानगी देण्यात आली आहे.    दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या लष्करी तळ, हवाई तळ आणि बंदरांचा वापर करू शकतील, ज्यामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या लष्करी तैनाती आणि ऑपरेशन्स सोपे होतील.  या करारामध्ये लॉजिस्टिक सपोर्टचाही समावेश आहे. या अंतर्गत इंधन, पाणी, दुरुस्ती, तांत्रिक संसाधने आणि इतर आवश्यक पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल. तसेच, विमानांसाठी एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि उड्डाणांशी संबंधित सेवा देखील मिळतील.  हा करार फेब्रुवारी 2025 मध्ये स्वाक्षरित झाला होता आणि डिसेंबर 2025 मध्ये रशियाने याला मंजुरी दिली. हा 5 वर्षांसाठी लागू राहील, ज्याला परस्पर संमतीने पुढे वाढवता येईल. तथापि, हा करार युद्धासाठी नाही. याचा वापर केवळ शांततेच्या काळात प्रशिक्षण, संयुक्त सराव आणि लॉजिस्टिक सहकार्यासाठी केला जाईल असे प्राथमिक रित्या जाहिर करण्यात आले आहे.

रशियाचा हा  निर्णय म्हणजे पाकिस्तान मध्ये उतरणाऱ्या अमेरिकन सैनिकाला उत्तर देण्यासाठी घेतलेला निर्णय म्हटले जात आहे. भविष्यात असे काही झाले तर भारत आपोआपच या युध्दात खेचला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!