समृध्दी वर भीषण अपघात ; १२ ट्रकचालकांनी वाचविला चालक

 

 

मेहकर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातानंतर काही ट्रकचालकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका ट्रेलर चालकाचे प्राण वाचले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहनचालकांमधील माणुसकीचे दर्शन घडले.

माहितीनुसार, नागपूरहून मुंबईच्या दिशेने मालवाहतूक करणारा ट्रेलर (एमएच ४६ डीसी ११५२) मेहकरजवळील मुंबई कॉरिडोरवरील चॅनेल क्रमांक २८७.२०० परिसरातून जात असताना त्याच्या पुढील आयशर ट्रकने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रेलरची जोरदार धडक बसली.  धडकेची तीव्रता इतकी होती की ट्रेलरच्या केबिनचा पुढील भाग चिरडला गेला आणि चालक वसीम अहमद (वय ४०, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) आतमध्ये अडकून पडले. जखमी अवस्थेत त्यांनी मदतीसाठी हाक दिल्यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रकचालकाने तातडीने वाहन थांबवून बचावकार्य सुरू केले. परिस्थितीची माहिती मिळताच इतर वाहनचालकांनीही मदतीसाठी धाव घेतली. सुमारे दहा ते बारा ट्रकचालकांनी एकत्रित प्रयत्न करत अडकलेल्या चालकाला केबिनमधून सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी आणि वेळेवर केलेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप इंगळे यांच्यासह पोलीस पथक आणि मेहकर पोलिसांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी चालकाला तातडीने मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर पोलिसांनी आणि महामार्ग प्रशासनाने तातडीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर सकाळपर्यंत वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

या प्रसंगात ट्रकचालकांनी दाखविलेली तत्परता, सहकार्याची भावना आणि माणुसकीची जाणीव सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!