मोताळा काँग्रेस कमेटी कडून आमदार सुनील शेळके यांना जाहीर पत्र; सात मुद्द्यांवर स्पष्टीकरणाची मागणी

 

एस. बि. शेख

धामणगांव बढे

काँग्रेस तालुका कमिटी, मोताळाचे अध्यक्ष प्रविण (आप्पा) कदम यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना जाहीर पत्र प्रसिद्ध करून त्यांच्या अलीकडील वक्तव्यांचा निषेध नोंदविला असून सात महत्त्वाच्या मुद्द्यांवर सार्वजनिक स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

पत्रात ५ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह आणि हिंसक स्वरूपाच्या वक्तव्यांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी कायद्याचा सन्मान राखत संयमी भाषा वापरावी, अशी अपेक्षा व्यक्त करत अशा प्रकारची वक्तव्ये लोकशाही आणि सामाजिक सलोख्यास पोषक नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यावेळी दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातानंतरच्या तपासाची सद्यस्थिती, विधानसभेत खुल्या चर्चेची मागणी, संबंधित विमान कंपनीच्या संदर्भात करण्यात आलेला पाठपुरावा, अपघातापूर्वीच्या सीसीटीव्ही फुटेजबाबतची भूमिका, एफआयआरच्या तपासाची प्रगती, पक्षनिष्ठेबाबतची भूमिका तसेच अर्थमंत्रालयाच्या बदलाबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, सार्वजनिक वक्तव्यांमुळे कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ नये, यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागावे, असेही पत्रात म्हटले आहे.
प्रविण (आप्पा) कदम यांनी संबंधित सर्व प्रश्नांना वस्तुनिष्ठ व सार्वजनिक उत्तर देण्याची मागणी केली असून या जाहीर पत्राची प्रत जिल्हाधिकारी, पुणे तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनाही पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!