शासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलढाणा येथे हुतात्मा दिनाचे पालन

भावी शिक्षक म्हणुन प्रशिक्षणार्थींनी नैतिक मुल्ये आत्मसात करावे

नुतन चव्हाण यांचे आवाहन
प्रतिनिधी | बुलडाणा
हुतात्म्यांचे बलिदान केवळ ऐतिहासिक घटना नाहीत, तर ते आजच्या शिक्षणासाठी मूल्याधिष्ठित शिक्षणाचा जिवंत स्रोत आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणातून राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी, नैतिक मूल्ये आणि कर्तव्यबोध आत्मसात करणे आवश्यक आहे. भावी शिक्षक म्हणून बी.एड. प्रशिक्षणार्थींनी या मूल्यांचे बीजारोपण विद्यार्थ्यांपर्यंत करावे, असे आवाहन प्राचार्या नुतन चव्हाण यांनी केले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ३० जानेवारी रोजी हुतात्मा दिन पाळला जातो. हा दिवस विशेषतः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बलिदानाची आठवण करून देतो. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांचा स्मृती दिन असून वर्ष १९५० पासून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये व सार्वजनिक संस्था यांमध्ये पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर शासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलडाणा येथे शुक्रवारी हुतात्मा दिनाचे पालन शिस्तबद्ध, भावपूर्ण आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून करण्यात आले. सकाळी १०:३० वाजता महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमांचे दीपप्रज्वलन व पूजन करण्यात आले. या पूजनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सत्य, अहिंसा, सेवा, त्याग व सामाजिक समतेची जाणीव रुजविण्यावर भर देण्यात आला. महात्मा गांधी यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्मितीतील नैतिक संदेश मिळाला, तर संत गाडगे महाराजांच्या समाजोपयोगी कार्यातून सेवा भावनेचे महत्त्व अधोरेखित झाले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणात मूल्याधिष्ठित दृष्टिकोन स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली. यावेळी प्राचार्य डॉ. एन. बी. चव्हाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांना हुतात्मा दिनाच्या ऐतिहासिक आणि शैक्षणिक महत्त्वावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी स्मृती दिन असल्याने त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो. असे सांगितले तर मौन स्तब्धतेतून विद्यार्थ्यांना त्याग, सहिष्णुता आणि जबाबदारीची जाणीव होते,” असेही त्या म्हणाल्या.
— केंद्र शासनाच्या पत्रानुसार कार्यक्रम–
सकाळी अचूक ११ वाजता केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाच्या पत्र क्रमांक २/१/२०२६–पब्लिक, दिनांक २२ जानेवारी २०२६ अन्वये संपूर्ण महाविद्यालयात दोन मिनिटे मौन पाळून देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. एच. पी. खोब्रागडे, प्रा. डॉ. सुनील खडसे, प्रा. भावना काळे, प्रा. प्रेरणा श्रीनाथ यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बी.एड. प्रशिक्षणार्थी व इतर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी छात्रअध्यापक आकाश भुसारी, भारती धोंगडे,हर्षवर्धन इंगळे, सावन चव्हाण, प्रशांत भास्कर, रामदेव जावरकर यांनी परिश्रम घेतले.
— स्वातंत्रय केवळ ज्ञान नाही तर मुल्यनिष्ठता शिकवते —
भावी शिक्षक आणि नागरिकांसाठी अनुभवाधारित शिक्षणाचा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी त्याग, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे मूल्य आत्मसात करावे. तरच शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये नैतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय मूल्ये रुजवण्याची संधी मिळते. हुतात्म्यांचे बलिदान आपल्याला शिकवते की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केवळ ज्ञान नाही, तर मूल्य, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा आवश्यक आहे.,असे मार्गदर्शन नुतन चव्हाण यांनी केले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!