जालना–खामगाव महामार्गावर लालपरी व दुचाकीचा भीषण अपघात

तीन जण गंभीर जखमी; अमडापूर–चिखली दरम्यान दिवठाणा पेट्रोल पंपासमोर घटना

जालना–खामगाव महामार्गावर लालपरी व दुचाकीचा भीषण अपघात
तीन जण गंभीर जखमी; अमडापूर–चिखली दरम्यान दिवठाणा पेट्रोल पंपासमोर घटना
प्रतिनिधी | उदयनगर
जालना–खामगाव महामार्गावर अमडापूर–चिखली दरम्यान दिवठाणा जवळील एका पेट्रोल पंपासमोर दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास लालपरी बस व दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जखमींना तातडीने उपचारासाठी चिखली येथील रुग्णालयात हलविले. ही घटना मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी घडली.
प्राप्त माहितीनुसार, बीड–अमरावती मार्गावरील एम.एच.-१४ एल.एक्स. ८९८७ क्रमांकाची लालपरी बस भरधाव वेगाने अमडापूर मार्गे अमरावतीकडे जात होती. तर मंगरुळ नवघरे येथील तीन जण दुचाकी एम.एच.-२८ सी.डी. ६७०३ ने भरधाव वेगाने चिखलीकडे जात होते. यावेळी अचानक भरधाव वाहनाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहनांची समोरा समोर धडक झाली. ही घटना दिवठाणा पेट्रोल पंपासमोर घडली. या धडकेत दुचाकीवरील तिघेही जण गंभीर जखमी झाले. मात्र नशिब बलवत्तर असल्याने तिघांचे प्राण वाचले. अपघात टाळण्यासाठी लालपरीच्या चालकाने शेवटच्या क्षणी आटोकाट प्रयत्न केल्याचे, तसेच संपूर्ण घटना घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका शेतकरी महिलेने ‘आखो देखा’ स्वरूपात उपस्थितांना सांगितल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पाहणी व पंचनामा केला. दरम्यान, अपघातामुळे बसमधील प्रवासी घाबरले असता, वाहकाने तत्परता दाखवत प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून त्यांचा पुढील प्रवास सुरक्षितपणे सुरू केला.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!