भरधाव वाहन पलटले; दोन ठार, २३ जखमी

सैलानीबाबांच्या दर्शनाला जात होते लातूर येथील भाविक

प्रतिनिधी | मेहकर

     मेहकर तालुक्यातील नांद्रा फाटा येथे रविवारी मध्यरात्री भरधाव वेगाने जाणारे वाहन पलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन अल्पवयीन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे २३ भाविक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

         लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील बागवान कुटुंब सैलानीबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. एमएच १३ सीयू ७६७० क्रमांकाच्या बोलेरो पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्यावर पलटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. चालकाला झोप लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  या अपघातात अरमान शरीफ बागवान (वय १६) व रिहान सैदु बागवान (वय १७, दोघे रा. अहमदपूर, जि. लातूर) यांचा जागीच मृत्यू झाला. इतर जखमींवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमी मध्ये  शहाना नाबीसा बागवान (३४), शबाना शरीफ बागवान (३४), इफत शरीफ बागवान (११), बुशरा अफिफा बागवान (१३), आलीया अनिस बागवान (२५), अफिफा अरीक बागवान (६), अफिस रौफ बागवान (१५), पाशा मोहम्मद शाह बागवान (७५), मैमीरा नबीसाहेब बागवान (१५), हिना अरीफ बागवान (३०), अमीर बागवान (१३), अनस रौफ बागवान (१२), अबुजर बागवान (१०), साहरा बागवान (६) आदींचा समावेश आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!