लोणार-मंठा रोडवर ओव्हरटेकच्या नादात अपघात; रेती टिप्परने दिली दुचाकीस्वार धडक

 

प्रतिनिधी लोणार

लोणार-मंठा मार्गावरील गणपती मंदिराजवळ आज दिनांक १० मे रोजी सकाळी 9,30 वाजेच्या सुमारास ओव्हरटेकिंगच्या नादात एका रेती टिप्परने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देण्यासाठी थांबलेल्या दुचाकीस्वाराला या धडकेत किरकोळ दुखापत झाली, दुचाकीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणता ही मोठा अनर्थ झाला नाही. या मार्गावरील रेती वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.”

मिळालेल्या माहितीनुसार, लोणार-मंठा रोडवर गणपती मंदिराजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता अरुंद झाला मुळे सुरक्षिततेचा विचार करून लोणार कडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने आपली गाडी रस्त्याच्या कडेला (डांबरी रस्त्याखाली) उभी केली होती. मात्र, त्याच वेळी लोणार कडून मंठ्याकडे जाणाऱ्या वाहनांमधील समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या घाईत असलेल्या एका रेती टिप्पर चालकाने रस्त्याच्या खाली मंठ्याकडे जाणाऱ्या वाहनाला साईड देण्यासाठी उभ्या असलेल्या दुचाकीला रेती टिप्पर चालकाने धडक दिल्यानंतर तिथून पळ काढला. या धडकेत दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला. अपघात होताच उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने दुचाकीस्वाराच्या मदतीसाठी धाव घेतली. यावेळी एका सुज्ञ नागरिकाने या संपूर्ण घटनेचे गांभीर्य ओळखून दुचाकीस्वार खाली पडलेला असताना व्हिडिओ चित्रीकरण केले, ज्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पीडित दुचाकीस्वाराने पायाला मुका मार लागल्याने आणि मोठे संकट टळल्याने सद्यस्थितीत कोणतीही तक्रार केली नसल्याचे समजते तरी या निमित्ताने या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोणार-मंठा या मुख्य मार्गावर अवजड रेती टिप्परची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकदा हे टिप्पर चालक अतिवेगात आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. अशा बेजबाबदार चालकांमुळे निरपराध लोकांचा जीव धोक्यात येत आहे. पोलीस प्रशासन आणि परिवहन विभागाने या मार्गावरील अवैध रेती वाहतुकीच्या वेगमर्यादेवर नियंत्रण मिळवून अशा चालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!