जिल्हाध्यक्ष निवडीवरुन कांग्रेस पक्षात प्रचंड असंतोष; शेळकेचे पाठबळ पडले कमी?

कांग्रेस प्रदेशाध्यक्षांना 'संगठन सृजन' अभियानाचा पडला विसर

 

बुलडाणा,

काेण म्हणतं राजकारणात लॉबिंग चालत नाही. किती ही श्रेष्ठ दर्जाचा पक्ष असो, पक्षाच्या वरिष्ठांवर दबाव आणला, लॉबिंग केली की ती यशस्वी होतेच, फक्त नियोजन त्या पध्दतीने असावयास हवे. नेमकं याच विषयात कांग्रेस पक्षाचे युवा नेते संदीप शेळके कमी पडले, अनं त्यांना जिल्हाध्यक्षपदाने हुलकावणी दिली. दुसरीकडे मानेगाव ते जळगाव जामोद या मार्गावर ४ मे रोजी काढण्यात आलेली अन्नदाता संघर्ष पद यात्रेत नियोजन करणाऱ्या प्रकाश पाटीलांच्या पथ्थ्यावर ही पदयात्रा पडली अनं त्यांच्याच गळयात जिल्हाध्यक्षपदाची माळा पडली. या एकंदरीत चित्रावरुन कांग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना पक्षाच्यावतीने प्रारंभ करण्यात आलेल्या संगठन सृजन अभियानाचा विसर पडला की काय असा प्रश्न जिल्हयातील कांग्रेसप्रेमीच्यावतीने केला जातो आहे. त्यामुळे कांग्रेस पक्षांतर्गत सुरु असलेल्या असंतोषाची दाहकता समोर येत आहे.

येन वेळी नीट परीक्षेचे पेपर फोडून गुणवत्ता मिळवणारा, व परीक्षेत दिवसरात्र परिश्रम करुन प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थी या दोघांची गुणवत्ता वेगवेगळी असते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. वेळेवर पेपर लीक करणाऱ्यांच्या विरोधात कांग्रेस पक्षाच्यावतीने काही महिन्यापूर्वी संगठन सृजन अभियान राबवण्यात आले होते. यात केवळ सक्रिय पदाधिकाऱ्यंानाच न्याय दयावयाचा निर्णय घेण्यात आला होता. या अभियानाच्या माध्यमातून पक्षाला लागलेली मरगळ झटकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या बाबत जिल्हयात अ.भा. काँ. कमिटीचे अब्दुल हनान यांनी येवून पदाधिकाऱ्यांना सक्रिय केले होते. त्यामुळे मागील अनेक महिन्यापासून जिल्हा कांग्रेस पक्षातंर्गत होणाऱ्या हालचालीवर जिल्हयातील नागरिकांचे बारीक लक्ष आहे. उबाठा गटात सदैव सक्रिय राहणारे नेते संदीप शेळके यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कांग्रेस पक्षात प्रवेश केला. जिल्हयात गळती लागलेल्या पक्षात शेळके यांचा प्रवेश झाला तेव्हाच अनेकाना विश्वास जागा झाला. शेळके हे नव्या दमाचे, तडफदार, मेहनती, चिकाटी असलेले व सक्रिय नेते आहेत. कांग्रेस पक्षात प्रवेश घेताच त्यांनी घाटाखाली व घाटावरी संपर्क वाढवणे सुरु केले होते. पक्ष संघटना वाढवण्यासह संपर्क ही वाढवण्यास सुरुवात केली होती. घाटावर अन्नदाता संघर्ष यात्रेचा बिगुल ही त्यांनी वाजवला होता, तेव्हाच त्यांची सक्रियता, कामकरण्याची जिदद पाहता अनेकांनी हा नेता भविष्यातील कांग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्याचा दावा केला होता. कारण ही तसेच होते, संदीप शेळके हे कॅडर मधून तापून निघालेलं नेतृत्व आहे. ग्राउंडवर काय अडचणी असतात हे त्यांना चांगलेच माहिती होते. त्यांनी जिल्हाभर संपर्काचे जाळे ही विनले होते. परंतू माशी नेमकी कुठे शिंकली हे शेवट पर्यत कळालेच नाही, कळाले ते केवळ प्रदेशाध्यांना.
प्रदेशाध्यक्षांना याची जाणीव झाली असावी ती अन्नदाता संघर्ष यात्रे दरम्यान. एरवी प्रकाश पाटील हे नाव घाटाखाली मर्यादेत आहे. मानेगाव पासून सकाळी ९ वाजता ही यात्रा सुरु झाली. यात्रा पुर्ण झाल्यावर याचा पाटलांनी मोठा गाजावाजा केला, परंतू या यात्रेचे जिल्हयाभर आवाहन करणाऱ्या शेळकेनी केवळ काम केले. परीक्षा झाल्यावर निकाल जाहिर झाला, मात्र या परीक्षेत शेळके यांना सपशेल नापास जाहिर करण्यात आले, याचे जिल्हयातील कांग्रेसप्रेमींना प्रचंड दुख झाले.

 

शेळके लॉबींग मध्ये पडले कमी?
संगठन सृजन अभियानाचा दावा करणाऱ्या कांग्रेस पक्षातले हे अभियान केवळ कागदावरच राबवण्यात आले. याकडे वरिष्ठांनी ही लक्ष दिले नाही. संदीप शेळके यांचे काम पाहून अनेकांनी त्यांच्या नावाची सिफारश दिल्ली दरबारी केली. परंतू हे तर पक्षात आत्ताच आले. हे नवीन आहे, वयाने अनुभवी नाही, आम्ही जुने आहोत, आम्हाला अनेक वर्ष झाली, आम्हाला संधी मिळाली नाही तर पक्षाला घाटाखाली खिंडार पडेल असा धमकी वजा इशारा मिळताच प्रदेशाक्षांच्या सृजन अभियानाच्या पार चिंधडया उडाल्या अनं शेळके हे धमकीच्या लॉबिंग मध्ये कमी पडल्याने त्यांच्या पदरी निराशा आली.

 

जिल्हयात कांग्रेस पक्षालाही हवे दोन जिल्हाध्यक्ष!
बुलडाणा जिल्हात एकूण १३ तालुके आहे. हा जिल्हा विस्तीर्ण आहे. जिल्हयाची निर्मितीच घाटाच्या खाली व वरी अशी झालेली आहे. त्या आधारे अनेक पक्षाने जिल्हयात दोन जिल्हाध्यक्ष ठरवले आहे. यामुळे काम करणे ही सोपे होते व संपर्क वाढवणे ही सोपे होते. जिल्हयातील कांग्रेसप्रेमी जनतेच्या भावनेचा आदर करत पक्षाने याच धर्तीवर आता कांग्रेस पक्षासाठी ही दोन जिल्हाध्यक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!