आता केंद्रीयमंत्रीने पाडले चिखलीला भगदाड

5 एप्रिलला होणार चिखलीत पक्षप्रवेश सोहळा

 

 

प्रतिनिधी | बुलडाणा

जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पाठोपाठ खासदार तथा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही भाजपाच्या चिखली मतदार संघात पक्ष प्रवेश कार्यक्रम ठेवून चिखलीला भगदाड पाडण्याचे  नियोजन केले आहे, यामुळे भाजपात खळबळ उडाली आहे.

चिखली येथील राधाबाई खेडेकर विद्यालयात तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक रविवार  29 मार्च रोजी पार पडली.  या बैठकीत उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव देशमुख शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के शिवसेना तालुका प्रमुख गजानन मोरे शिवसेना शहर प्रमुख विलास घोलप माजी जिल्हा परिषद सदस्य शरद हाडे न पा उपाध्यक्षा वैशाली कपील खेडेकर शिवसेना शिक्षक सेनेचे वसंतराव गाडेकर उपस्थित होते यावेळी  केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव  यांनी  पक्षतील पदाधिकारी सदस्य शिवसेनेचे मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यावर विश्वास ठेवुन शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश करू इच्छितात . त्या सर्वांना सोबत घेऊन आपल्या पक्षाची ताकद वाढवावी,  येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी येत्या 5 एप्रिलला शिवसेना पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे.  या कार्यक्रमाचा योग्य नियोजन शिवसेनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी करावे असे आवाहन त्यांनी  केले.

एका पाठोपाठ होणाऱ्या पक्ष सोहळयाच्या कार्यक्रमामुळे भाजपात चिंतेचे वातावरण आहे. या घटनामुळे चिखलीतील राजकिय वातावरण चांगलेच तापणार असल्याची चर्चा आहे.

 

 

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!