मलकापूर ग्रामीण पोलिसांची दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई; ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर,
जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत मलकापूर ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून देशी दारूसह दुचाकी असा एकूण ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही ९ जून रोजी सकाळी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलडाणा) व श्रेणिक लोढा (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या आदेशानुसार जिल्हयात सर्वत्र अवैध मद्यविक्री विरोधात मोहिम राबवली जात आहे. मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकीने अवैध दारु तस्करी केली जात असल्याची माहिती मलकापूर ग्रामीण पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारावर ग्रामीण पोलिसांनी मलकापूर मुख्य मार्गावर संशयीत दुचाकीस्वारास थांबवून तपासणी केली असता आरोपीकडे १० बॉक्स देशी दारू (किंमत ४३ हजार २०० रुपये) तसेच एक दुचाकी वाहन (किंमत ५० हजार रुपये) असा एकूण ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अवैध मद्यविक्रीविरोधात पोलिसांचा धडाका
जिल्ह्यात अवैध मद्यविक्री, वाहतूक व साठेबाजी रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणी छापेमारी करून दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. मलकापूर ग्रामीण पोलिसांची ही कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले.

या पथकाने पार पाडली कारवाई

मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारूविरोधात करण्यात आलेली ही कारवाई पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, हेड कॉन्स्टेबल गजानन दराडे, हेड कॉन्स्टेबल जगदेव टेकाळे, हेड कॉन्स्टेबल दिनेश बकाले, हेड कॉन्स्टेबल युवराज राठोड, महिला पोलीस अंमलदार पूजा साळवे, महिला पोलीस अंमलदार कोमल इंगळे आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज खरडे यांचा समावेश होता. पथकाच्या सतर्कतेमुळे अवैध मद्यसाठा व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!