महेश इंटरनॅशनल स्कूल, मेहकर येथे क्रीडा सप्ताह प्रारंभ

प्रतिनिधी | मेहकर
स्थानिक महेश इंटरनॅशनल स्कूल, येथे क्रीडा सप्ताह प्रारंभ करण्यात आला. हा सप्ताह ३१ जानेवारी रोजी सुरु करण्यात आला. या सप्ताहाची सुरुवात माता सरस्वती व भगवान महेश यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून क्रीडा सप्ताहाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी रूपाली बोरे, भिकाजी माल, गौरी म्हस्के, वैशाली पवार, ऋतुजा जाधव, कल्पना मोरे, विकास ढोले, कोमल निकस, सुजाता देव्हडे, किशोर गवई, सपना गवई, नागेश सावंत, नेहा सावंत, दुर्गा दायमा, पूजा लोहिया, सुदर्शन तापडिया, महेंद्र देशमुख, सुदर्शन अग्रवाल, वैभव पऱ्हाड, पवन बोरे, सुवर्णा शेवलीकर, महेंद्र बार्डेकर, हर्षा गट्टाणी, अश्विनी सांगोळे, संतोष सहाणे, शिवा हुंबाड, सतीश चावरे आदींसह शाळेच्या प्राचार्या ज्योती मंत्री व उपप्राचार्य के. एम. गायकवाड उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्या ज्योती मंत्री यांनी खेळाचे मानवी जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत कबड्डी, खो-खो, लिंबू-चमचा, धावणे, बुक बॅलन्सिंग, स्लो सायकलिंग, संगीत खुर्ची आदी विविध क्रीडा प्रकार घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक सुनील चव्हाण, उपप्राचार्य के. एम. गायकवाड, तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे संचालन वर्षा बोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सविता जोशी यांनी केले.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!