येथील कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

 

लोणार

स्थानिक कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय आणि कै. कमलाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतोष बनमेरू उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अमृत सेवा संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. रमेश बनमेरू, क्षेत्रीय समन्वयक डॉ. कमलाकर वाव्हळ व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. महेंद्र भिसे मंचावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर डॉ. महेंद्र भिसे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. अर्चना दराडे, कु. श्रुतिका पसरटे आणि कु. गायत्री बनमेरू यांनी आपल्या मनोगतातून जीवनातील शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्त्व, शिक्षकांमुळे मिळणारे यश आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शन करताना डॉ. कमलाकर वाव्हळ यांनी सांगितले की, विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ शिक्षकांच्या सानिध्यात राहत असल्याने शिक्षकच सुशिक्षित व सुसंस्कृत पिढी घडून आणू शकतात, तर श्री. रमेश बनमेरू यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील शिक्षकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. शेवटी अध्यक्षीय समारोपात डॉ. संतोष बनमेरू यांनी शिक्षक हे निरंतर ज्ञानदानाचे काम करत असतात आणि विद्यार्थ्यांनीही महाविद्यालयात जास्तीत जास्त उपस्थित राहून ज्ञान ग्रहण करावे व आपल्या यशाचे ध्येय गाठावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!