लोणार येथे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाला भावपूर्ण श्रद्धांजली

प्रतिनिधी | लोणार
शहरात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश दाखल होताच संपूर्ण शहरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. यावेळी शेकडो नागरिकांनी अस्थिकलशावर पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. हा कार्यक्रम ३ फेब्रुवारी रोजी दुपारी पार पडला.
यावेळी अस्थिकलश रॅलीसह माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार मनोज कायदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, नाझेर काजी आदी उपस्थित होते. यावेळी अस्थिकलश लोणार येथील शिवहरी कॉम्प्लेक्समध्ये ठेवण्यात आला होता. सभामंडपात उपस्थित सर्वांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी लोणार शहरातील प्रकाशराव मापारी, प्रकाशराव धुमाळ, राजेश मापारी, संतोष मापारी, बळीराम मापारी, डॉ. अनिल मापारी, प्रताप बनकर, भगवान पाटील सुलताने, अंबादास खंड, अनिकेत मापारी, सचिन मापारी, हिम्मतराव सानप, जितेंद्र घुले, मयूर गोलेच्छा, गजानन मापारी, हाजी मकसूद, अक्षय इंगळे, संजय वायाळ, शेख समद, गोपी आखाडे, जावेद कुरेशी यांच्यासह ठाणेदार प्रकाश सदगिरे, तहसीलदार भूषण पाटील, गणेश लोंढे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅलीमधून अस्थिकलश सभामंडपात आणताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाशराव धुमाळ व इतर पदाधिकाऱ्यांनी खांदा देत आदरांजली व्यक्त केली. श्रद्धांजली कार्यक्रमानंतर अस्थिकलश पुढील प्रवासासाठी मेहकरकडे रवाना करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!