शालेय क्रीडा स्पर्धेत चिखली व जळगाव तालुक्याचा दबदबा

विद्यार्थ्यांनी शिस्त व खेळाडू वृत्ती जोपासावी

प्रतिनिधी |बुलडाणा
जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांचा शोध घेणारे दालन असून विद्यार्थ्यांनी आयुष्यभर आपल्या अंगी शिस्त व खेळाडू वृत्ती जोपासावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी थाटात पार पडला. या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, शिवशंकर भारसाकळे, प्रमोद एंडोले ,प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी स्नेहल माने, गटविकास अधिकारी समाधान वाघ व जिल्हा परिषदेचे अन्य विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
— भिंगारा व सवणा या शाळांमध्ये रंगल सामना–
जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भिंगारा व चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सवणा या दोन संघातील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्याचा धागा पकडून
— खेळाडु वृत्ती अंगी असल्यास सामोरे जाण्याचे बळ मिळते —
गुलाब खरात म्हणाले की , कोणत्याही क्रीडा स्पर्धेतील सामन्यात पंचांनी दिलेला निर्णय हा पुनर्विलोकित होऊ शकतो. मात्र जीवनातील अनेक प्रसंगात घेतलेल्या निर्णयाचे पुनर्विलोकन अनेकदा शक्य होत नाही. मात्र शिस्त व खेळाडू वृत्ती अंगी असल्यास घेतलेल्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ मिळते. म्हणून जय -पराजयाकडे न बघता आपल्या क्षमतांचा परिपूर्ण विकास होईल , यासाठी विद्यार्थ्यांनी जीवनभर आपल्या अंगी शिस्त व खेळाडू वृत्ती जोपासावी, असे आवाहनही त्यांनी केले.

— एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग —
वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात प्राथमिक व उच्चप्राथमिक अशा दोन गटांसाठी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील तेराही पंचायत समिती मधून सांघिक प्रकारात कबड्डी, खो-खो, ४०० मीटर रिले तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात १०० मीटर व२०० मीटर धावण्याची शर्यत अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे १००० विद्यार्थी सहभागी झाले होते.
— वैयक्तीक क्रीडा प्रकारात सर्व पंचायत समित्यांनी यश —
सांघिक प्रकारात कबड्डी व खो-खोच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही गटात पंचायत समिती जळगाव जामोद व चिखली च्या शालेय संघांनी आपला दबदबा निर्माण केला होता. तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात सर्व पंचायत समित्यांना संमिश्र यश मिळाले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मुलामुलींच्या खो-खोच्या दोन्ही अंतिम सामन्याच्या वेळी नाणेफेक करून मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी पूर्णवेळ  आनंद घेतला व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
—-

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!