१०० कोटीचा काय १००० कोटीचा दावा टाका; आ. संजय गायकवाड झाले आक्रमक

भाजप - सेना वाद चिघळला; पोलिसात दिली तक्रार

प्रतिनिधी | बुलडाणा,
जिल्हयात भाजप व शिवसेना या दोघांचा वाद आता चांगलाच चिघळला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर करण्यात आलेल्या कथित आरोपानंतर विजयराज शिंदे यांनी वक्तव्या बददल माफी मागा, अन्यथा १०० कोटीचा अब्रूनूकसानीचा दावा करेल असा इशारा दिला होता. यावर आमदार संजय गायकवाड चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी १० एप्रिल रोजी त्यांनी शिंदे यांना प्रती उत्तर देत, १०० कोटीचा काय १००० कोटीचा दावा टाका असे उत्तर दिले आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.
विजयराज शिंदे यांची तक्रार पोलिस ठाण्यात पोहचताच आमदार संजय गायकवाड यांच्यावतीने कार्यकर्त्यांनी विजयराज शिंदे यांचेवर जुना अॅक्ट्रासिटी प्रकरणात अद्याप ही जामीन मिळाला नसल्याने त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. या साठी शिंदे सेनेचे कार्यकर्ते पेालीस अधीक्षक कार्यालयावर पोहचले. तसेच आमदार गायकवाड या प्रकरणी म्हणाले की, आदिवासी आश्रम शाळा संदर्भात शासनाने जो चौकशी अहवाल दिला. त्यात बऱ्याच गोष्टी नमुद आहे. पुरावे असल्याशिवाय मी बोलत नाही. त्यामुळे १०० कोटीचा काय १००० कोटीचा दावा टाका असे प्रति आवाहन ही आ. संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांना केले.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!