जिल्हा शासनाचे डोळे आता तरी उघडणार काय?

जिल्हयात ३३५ वर्ग खोल्या शिकस्त, जीव मुठीत घेवून शिकत आहेत मुले

बुलडाणा

जिल्हयातील चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन शिकस्त झालेल्या खोल्या कोसळल्या. ही घटना रविवारी दुपारी घडली. दरम्यान शाळेला सुटटी असल्याने विद्यार्थांचा जीव वाचला, या घटनेतुन जिल्हा प्रशासनाचे आता तरी डोळे उघडतील काय असा प्रश्न संतप्त पालकांच्यावतीने केला जातो आहे.

यंदा शैक्षणिक वर्ष प्रारंभ झाल्यावर शासनाच्यावतीने अनेक नवनवीन आदेश देण्यात आले. यात शिक्षकांच्या मुल्यामापनासह विद्यार्थांचे मुल्यमापन, विद्यार्थांना अपार नोंदणी क्रमांकाचे वाटप, शिक्षकांच्या सांकेतिक क्रमांकाची पडताळणी यासह शाळेचे मुल्यमापन, शाळेतील सुविधा, विद्यार्थांची सुरक्षा बाबत आदेश देण्यता आले आहे. यातील अनेक आदेश कागदोपत्रीच रेंगाळत पडल्याची माहिती आहे. या सर्वापेक्षा अत्याधिक महत्वाचा मुददा नुकतेच सोमठाणा येथील घटने मुळे पुन्हा एक वेळ समोर आला आहे, तो म्हणजे शिकस्त शाळांची दुुरस्ती. जिल्हयात एकूण २३२५ प्राथमिक शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेच्या १४१३ शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेला सरकारी शाळा समजल्या जाते. या शाळेत विद्यार्थाना सुविधा मिळत नसल्याची ओरड सातत्याने होते. अनेक शाळेत शौचालय, पीण्याचे पाणी, स्वच्छता, वर्गाची स्वच्छता, शाळेच्या खोल्या या शिकस्त असल्याचे, बसण्यासाठी बाक नसल्याची ओरड पालकांच्यावतीने केली जाते. त्यामुळे शासनाच्यावतीने नुकतेच एप्रिल महिण्याच्या प्रारंभी जिल्हयातील सर्वच शाळांचे मुल्यमापण करण्याचे आदेश संचालकाच्यावतीने देण्यात आले आहे. परंतू या संदर्भात अद्याप ही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. परिणामी सोमठाणा येथील घटने पश्चात बुलडाणा जिल्हयातील इतर ठिकाणी ही अशी घटना होवू नये यासाठी पालकांच्यावतीने चिंता व्यक्त केली जात आहे.

 

सोमठाण्यातील अशी आहे घटना

चिखली तालुक्यातील सोमठाणा परिसरात मागील काही दिवासपासून सातत्याने पाउस कोसळत आहे. या गावात जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा आहे. या शाळेत वर्ग पहिली ते सातवी पर्यतचे शिक्षण दिले जाते. सदर शाळेचे निर्माण १९५७ मध्ये झाले असल्याची माहिती आहे. सदर शाळेची इमारत शिकस्त झाली असल्याची माहिती शाळेच्यावतीने प्रशासनाला देण्यात आली होती. सदर खोल्या धोकादायक असल्याने मागील दोन वर्षापासून या खोल्यातील शिक्षण बंद करण्यात आले होते. दरम्यान रविवारी सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे या खोल्या कोसळल्या.

 

 

अशा आहेत जिल्हयातील शिकस्त खोल्या

तालुका – शाळा – वर्ग खोल्या

बुलडाणा, २४, ४०

चिखली, १३ , २०

खामगाव, २१,२५

दे.राजा, ०९,१४

मोताळा, १६,२५

लोणार, १६,२२

मलकापूर, ८,९

मेहकर, १८,२०

ज.जामोद, १०,१४

नांदुरा, ८,१०

संग्रामपूर, ३०,७१

शेगाव, १४,१६

सिं.राजा, २३,३९

 

अशी आहे जिल्हयातील शाळा संख्या

जिल्हयात एकूण प्राथमिक शाळा – २३२५

जिल्हा परिषदेच्या एकूण प्राथमिक शाळा – १४१३

नगर पालिकेच्या एकूण शाळा – १०७

जिल्हयातील एकूण खाजगी शाळा – ७९८

नगरपालिकेचे हायस्कूल – ०७

 

 

डीपीसी मध्ये प्रस्ताव मांडणार

जिल्हयातील शिकस्त शाळेच्या दुरुस्ती संदर्भात आपण डीपीसी मध्ये लवकरच निधीची मागणी करणार आहोत. निधी मिळताच आपण दुरुस्तीची कामे सुरु करणार आहोत.

गुलाबराव खरात, मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!