ध्येय निश्चित करून सातत्याने कष्ट घ्या – संदीप शेळके

बुलडाण्यातील जिजाऊ ज्ञान मंदिरात पार पडला निरोप समारंभ

प्रतिनिधी | बुलडाणा
आयुष्यात एकच स्पष्ट ध्येय ठेवा आणि त्या ध्येयपूर्तीसाठी सातत्याने कष्ट घ्या. परीक्षेच्या काळात तणावमुक्त राहून ध्यान, योग व प्राणायामाचा आधार घ्या, असे आवाहन जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु. सायन्स व क्रॉप सायन्स कॉलेज, पळसखेड भट येथील दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात अध्यक्षीय भाषणात शाळेचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले.
येथील राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट, सुंदरखेड (बुलडाणा) संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु. सायन्स व क्रॉप सायन्स कॉलेजमध्ये हा निरोप समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप शेळके होते. प्रमुख उपस्थितीत शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. निरोप समारंभात विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात सर्व सोयी-सुविधायुक्त डिजिटल माध्यमातून, कोणतेही अतिरिक्त क्लास न लावता दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला.
अध्यक्षीय भाषणात संदीप शेळके पुढे म्हणाले की, आदरणीय भाऊसाहेब शेळके यांनी लावलेला शिक्षणरूपी वटवृक्ष आज उत्तरोत्तर वाढत आहे. जिजाऊ ज्ञान मंदिरातील विद्यार्थी विविध क्षेत्रात सहभाग घेऊन प्राविण्य मिळवत आहेत, याचा अभिमान आहे. पुढील काळात उद्योग, शिक्षणासाठी देश-विदेशात जाताना कोणतीही अडचण आल्यास संस्था व आपण स्वतः विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य किशोर सिरसाट यांनी केले. सूत्रसंचलन जान्हवी भिवटे यांनी तर आभार प्रदर्शन समीक्षा झगरे यांनी केले.

विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभात मनोगत व्यक्त करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामीण भागात असूनही डिजिटल माध्यमातून दर्जेदार शिक्षण, शिस्तबद्ध मार्गदर्शन व कोणतेही अतिरिक्त क्लास न लावता मिळालेल्या शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांनी संस्थेचे व शिक्षकांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!