ना हुंडा, ना दिखावा! धामणगाव बढे येथे सुन्नतनुसार आदर्श निकाह

अनावश्यक खर्च आणि रूढी-परंपरांना फाटा देत समाजासमोर ठेवला आदर्श

धामणगाव बढे : एस. बी. शेख

आजच्या काळात विवाह म्हटला की लाखोंचा खर्च, भव्य सजावट, मोठमोठे स्वागत समारंभ आणि अनावश्यक रूढी-परंपरांचा सुळसुळाट दिसून येतो. अनेकदा प्रतिष्ठेच्या नावाखाली कर्ज काढून विवाह सोहळे साजरे केले जातात. मात्र, या दिखाऊ विवाह संस्कृतीला छेद देत धामणगाव बढे येथे सुन्नत-ए-नबवीनुसार अत्यंत साधेपणाने निकाह सोहळा पार पडला. हुंडा, अनावश्यक खर्च आणि दिखाव्याला पूर्णपणे फाटा देत संपन्न झालेल्या या विवाहाने समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.

शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ रोजी मरकजे इस्लामी जामा मस्जिद, धामणगाव बढे येथे असलम खान दिलावर खान पठाण यांची कन्या आमेना तबस्सुम (धामणगाव बढे) आणि जळगाव खान्देश येथील शेख असगर यांचे सुपुत्र शेख इस्माईल यांचा निकाह धार्मिक वातावरणात संपन्न झाला.  या निकाहचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नवरदेवाकडून केवळ १२ ते १५ वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती होती. कोणताही अवाजवी खर्च, अनावश्यक रितीरिवाज, वरातीच्या जेवणाचा बडेजाव किंवा हुंड्याची देवाणघेवाण करण्यात आली नाही. विशेष म्हणजे मुलाकडील मंडळींकडून कोणत्याही प्रकारची मागणी करण्यात आली नाही. प्रेषित हजरत मुहम्मद ﷺ यांच्या शिकवणीनुसार अत्यंत साध्या, शिस्तबद्ध आणि सन्मानपूर्वक वातावरणात हा निकाह पार पडला.

यावेळी मौलाना हाफिज मुजाहिद साहेब, बुलढाणा यांनी ‘निकाह साधा आणि सोपा करा’ या विषयावर उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. निकाहमध्ये साधेपणा, धार्मिक शिकवण आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. तर मौलाना अमीन साहेब यांनी दुवाचे पठण केले.  या प्रसंगी गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, मरकजे इस्लामी जामा मस्जिद पंच कमिटीचे सदस्य तसेच जमाते इस्लामी हिंद शाखा धामणगाव बढेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!