जळगाव जामोद–संग्रामपूर तालुक्यात ‘खरीप पूर्व आढावा सभा आज

जळगाव जामोद–संग्रामपूर तालुक्यात ‘खरीप पूर्व आढावा सभा आज

प्रतिनिधी | संग्रामपूर

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत “कृषी तंत्रज्ञानाचा जागर – खरीप हंगाम मोहीम 2026” अंतर्गत जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप पूर्व आढावा सभा व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम  मंगळवार,  २१ मे  रोजी सकाळी १०.०० वाजता “योगा हॉल”, नगर परिषद, जळगाव जामोद येथे होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. संजय कुटे हे राहणार असून, मार्गदर्शनासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, प्रशांत पाटील तहसीलदार संग्रामपूर, पवन पाटील तहसीलदार जळगाव जा. व स्मार्ट प्रकल्प संचालक दीपक बडे यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद जळगाव जामोदचे मुख्याधिकारी सुरज जाधव यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे.
कार्यक्रमात विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असून, हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम, सेंद्रिय शेती व पीक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण उपाययोजना, पीक कर्ज व विमा योजना, तसेच बाजारपेठेतील संधी याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ तसेच संबंधित विभागातील अधिकारी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी आणि आर्थिक उत्पन्न मजबूत करण्यासाठी अशा प्रशिक्षणांचा लाभ घेणे अत्यावश्यक आहे.

त्यामुळे जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनपर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी केले आहे. “शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांसाठी चालविलेली बाजार व्यवस्था म्हणजेच आदर्श बाजार व्यवस्था होय” हा संदेश देत कृषी विभागाने शेतकऱ्यांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!