शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे बुलढण्यात जाहीर वाचन

अ‍ॅड. असीम सरोदे यांचे आ. गायकवाड यांना थेट आव्हान

बुलडाणा | प्रतिनिधी

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी निर्माण केलेल्या मुद्याला विरोधकांनी उचलुन धरले आहे.  अनेकांनी या विषयी टीका केली आहे. आता या प्रकरणात विधीतज्ज्ञ असीम सरोदे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी बुलडाण्यात थेट शिवाजी कोण होता या  पुस्तकाचे जाहिर वाचन करणार असल्याचे सांगत थेट आमदार संजय गायकवाड यांना आवाहन दिले.

बुलढाण्यात लवकरच ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे जाहीर वचन करण्यात येणार. संजय गायकवाड काय करतो बघू, अशा शब्दात असीम सरोदे यांनी थेट आव्हान दिले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, आमदार संजय गायकवाड यांची भाषा बघा. 1988 मध्ये प्रकाशित शिवाजी कोण होता या गोविंद पानसरे सर यांच्या पुस्तकाच्या शीर्षकात ‘शिवाजी कोण होता’ असा एकेरी उल्लेख का? असा संजय गायकवाडचा आक्षेप आहे व त्यासाठी त्याने पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून अत्यंत अश्लील, अर्वाच्य शिव्या दिल्या. त्याच भरात संजय गायकवाड असे म्हणाला की, शिवाजी महाराज तुया मायचा नवरा होता असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केला.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!