शासनाच्या विरोधात सीटूचा देशव्यापी संप

जिल्ह्यातील कामगार-कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – कॉ. पंजाबराव गायकवाड

प्रतिनिधी | बुलडाणा
शासनाने कामगार हितासंदर्भात घेतलेले निर्णय हे चुकीचे आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात सीटूच्यावतीने देशव्यापी संपाचे आयोजन करण्यात आले आहे. हा संप १२ फेब्रुवारी पुकारण्यात आला आहे. या अनुशंगाने सीटूच्यावतीने जिल्हा प्रशासनाला २ फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, मोदी सरकारने कामगारहिताचे २९ जुने कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी कोणतीही व्यापक चर्चा न करता भांडवलधार्जिण्या आणि कामगारविरोधी चार श्रमसंहिता संसदेत बहुमताच्या जोरावर मंजूर केल्या आहेत. या श्रमसंहितांची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारांना देण्यात आले आहे. या मुळे देशातील कामगारांची सुरक्षितता आणि हक्क मोठ्या प्रमाणात धोक्यात येणार आहेत, असा आरोप सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांनी केला आहे. १ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात कामगार-कष्टकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच आरोग्य, शिक्षण व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करून महागाई आटोक्यात आणण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. देशातील महिला व बाल विकास, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मध्यान्ह भोजन योजना यांसारख्या महत्त्वाच्या सरकारी योजनांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स, गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचारिका तसेच शालेय पोषण आहार कामगार अत्यंत अल्प मानधनावर काम करत आहेत. विशेष म्हणजे २०१८ पासून त्यांच्या मानधनात एक रुपयाचीही वाढ केंद्र सरकारने केलेली नाही. या भांडवलधार्जिण्या सरकारी धोरणाच्या निषेधार्थ १२ फेब्रुवारी रोजी सीटूसह देशातील प्रमुख कामगार संघटनांनी एकदिवसीय अखिल भारतीय संप पुकारला असून या अन्यायकारक परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या महिला कामगारांनी १२ फेब्रुवारीच्या अखिल भारतीय संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यावेळी प्रशासनाला निवेदन देतांना अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा व जिल्हा सचिव प्रतिभा पाटील, गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव जयश्री तायडे, रेखा इंगळे, अर्धवेळ स्त्री परिचारिका संघटनेच्या जिल्हाध्यक्ष छाया खंडारे, शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या उपाध्यक्षा शोभा काळे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे तसेच नर्मदा शिरसाट, सुरेखा डोंगरे, सुरेखा गायकवाड, छाया जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

कामगार कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हा
शासनाने मंजूर केलेल्या कामगारविरोधी चार श्रमसंहिता व भांडवलधार्जिण्या सरकारी धोरणाच्या निषेधार्थ १२ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय संप पुकारण्यात आला आहे३ या संपात जिल्ह्यातील जास्तीत जास्त कामगार व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांनी केले आहे.
000

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!