आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यसेवा प्रकल्पात सेवाभावी उपक्रम

प्रतिनिधी | बुलढाणा
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त वरवंड येथील दिव्यसेवा प्रकल्पात मानवतेचा संदेश देणारा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने प्रकल्पातील बेघर, निराधार व मनोरुग्ण बांधवांना आमरसासह मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
समाजातील उपेक्षित घटकांसोबत वाढदिवस साजरा करताना कार्यकर्त्यांनी मनोरुग्णांशी आत्मीयतेने संवाद साधला व त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली. या वेळी अनेक मनोरुग्णांनी आनंद व्यक्त करत आयोजकांना आशीर्वाद दिले. त्यामुळे संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

वरवंड येथील दिव्यसेवा प्रकल्प हा निराधार व मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तींसाठी आधारस्थान ठरत असून येथे त्यांना उपचारासह मायेची सावली मिळत आहे. अशा ठिकाणी जाऊन वाढदिवस साजरा करून “माणुसकी हाच खरा धर्म” हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड,नगरपालिका उपाध्यक्ष श्री गजेंद्र दांदडे, बांधकाम सभापती बाळासाहेब धुड, शिवसेना शहर प्रमुख आशिष जाधव, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड,सरपंच श्री प्रवीण जाधव, शिवदूत तालुकाप्रमुख नितीन राजपूत, माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक विजय जायभाये, शिवसेना उपशहर प्रमुख विजय कोल्हे, नगरसेवक नयनप्रकाश शर्मा, नगरसेवक अजय हडाले, नगरसेवक बबलू मावतवाल, नगरसेवक सतीश बरडे, नगरसेवक युनूस मेंबर, नगरसेवक मोहन पऱ्हाड, नगरसेवक योगेश परसे, संजय निकम, अशोक वावरे, अजय खोत, अनिल पवार, अजय बिल्लारी, पुरुषोत्तम हेलगे, शेख जावेद, शेख बाबा, नगरसेवक प्रशांत जाधव, नगरसेवक देवेन खोत, पवन भालेराव,विजय दुरणे, संजय पंडितकर अरुण ढोरे, जगदीश मानवतकर, विकास राजपूत, मा.नगरसेवक गोविंदा खुमकर, बंडू आसाबे, विष्णुमामा मुळे, सोळंकी मेजर, नगरसेवक अमित ठाकरे, नगरसेवक सागर घट्टे, कुणाल अग्रवाल,वरवंड सरपंच बाळाभाऊ जेऊघाले, नंदकिशोर जाधव, अरुण जेऊघाले, नगरसेवक जाकीर कुरेशी, आकाश धंदर, भीमराज जेऊघाले, भगवान नाना चाव्हरे , सोमेश गायकवाड, गोलू जेऊघाले, शिवाजी चव्हाण, कृष्णा धंदर, दत्तू नाना जेऊघाले ,रमेश जुमडे, राजू इटकर, संजय चाटे,यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!